नाशिक- ‘आले किती गेले किती, उडून गेला भरारा...कधी संपला नाही अन् कधी संपणार नाही शिवसेनेचा (उबाठा) दरारा’ अशा परखड शब्दात आपली निष्ठा व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी ‘आम्ही इथेच’ पक्षासोबत असल्याचे ठामपणे सांगितले. पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता.१६) पक्षाच्या ’निर्धार शिबीरात’ माजी खासदार अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे व नाशिकचे विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रकट मुलाखत घेतली.