नाशिक- जागेच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह दोघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊसाहेब आबा तांबडे (रा. सारूळ) यांच्या फिर्यादीवरून चुंभळे यांच्यासह गणेश सूर्यवंशी (रा. गौळाणे), ज्ञानेश्वर चौधरी व रतन नवले (रा. सारूळ) यांच्यासह आठ ते दहा जणांवर वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.