धुळे : टुडे पान २ साठी.......
---
सूचना ः सुधारित बातमी घ्यावी
---
फोटो क्रमांक : 35009
सोनगीर (ता. धुळे) : सुवर्णगिरी किल्ल्यावर शिवप्रताप दिनानिमित्त नवीन भगवा ध्वज फडकवून शिवप्रतिमेचे पूजन करताना उपस्थित शिवप्रेमी.
---
सुवर्णगिरी किल्ल्यावर
विधिवत ध्वजारोहण
शिवप्रताप दिनानिमित्त प्रतिमापूजन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : सोनगीर (ता. धुळे) येथील ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ल्यावर दिवाळी पर्व आणि शिवप्रताप दिनानिमित्त विधिवत ध्वजारोहण झाले. त्या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘हर हर महादेव’, अशा घोषणांनी किल्ला परिसर दुमदुमून गेला. १० नोव्हेंबर १६५९ ला प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे सुवर्णगिरी किल्ल्यावर स्मरण करत उपस्थित शिवप्रेमींनी इतिहासाला उजाळा दिला.
या पार्श्वभूमीवर सुवर्णगिरी किल्ल्यावर नवीन भगवा ध्वज आणण्यात आला. नंतर शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करून दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. ईश्वर पाटील, दिनेश ठाकूर, अनिल पवार यांच्या पुढाकाराने दिवाळीच्या आनंद पर्वात शिवप्रेमींनी हा उपक्रम राबविला. शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव, संजय पाटील, गोकुळ पाटील, संदीप पवार, नितीन पाटील, दीपक देवरे, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील उपस्थित होते.