निफाड शारदीय व्याख्यानमाला

निफाड शारदीय व्याख्यानमाला
Published on: 
पोटो-08780 निफाड ः शारदीय व्याख्यानमालेच्या उद्‍घाटनप्रसंगी बोलताना ॲड. जयंत जायभावे. छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्राभिमानाचे प्रतीक ॲड. जयंत जायभावे ः निफाडला शारदीय व्याख्यानमालेचे उद्‍घाटन निफाड, ता. ७ ः मूळ संविधानातील चित्रांची अधिकृत यादी भारताच्या दीर्घ इतिहासाचे प्रतिनिधित्व करते. याच इतिहासाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र दिसते. छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे आराध्य दैवत नव्हे; तर ते स्वराज्य, न्याय, लोककल्याण आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक होते. महाराजांनी रयतेला केंद्रस्थानी ठेवून राज्यकारभार केला. धर्म, जात, पंथ या पलीकडे जाऊन प्रजेच्या सुरक्षिततेला महत्त्व दिले. त्यामुळेच संविधानाच्या मूळ कलात्मक प्रतीत त्यांचे आहे, असे महाराष्ट्र, गोवा कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. जयंत जायभावे यांनी सांगितले. येथे शारदीय व्याख्यानमालेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आई भगवती व माता-पिता स्मृतिदिनानिमित्त येथे शारदीय व्याख्यानमाला होत आहे. या व्याख्यानमालेचे रविराज मंगल कार्यालय येथे उद्‍घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. व्याख्याते स्वानंद बेदरकर, प्रायोजक वि. दा. व्यवहारे, गुलाब टकले, मंदाकिनी टकले व व्याख्यानमालेचे अध्यक्ष रतन वडघुले उपस्थित होते. प्रास्ताविक वि. दा. व्यवहारे यांनी केले. ॲड. जायभावे म्हणाले, की संविधानाच्या पानांवर केवळ कायद्याची भाषा नाही; तर भारताच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि ऐतिहासिक प्रवासाची चित्रेही आहेत. सिंधू संस्कृतीपासून वैदिक काळापर्यंत, महाभारतापासून बुद्ध आणि महावीरांपर्यंत, सम्राट अशोकापासून विक्रमादित्यापर्यंत आणि मध्ययुगापासून स्वातंत्र्यलढ्यापर्यंतचा भारत या चित्रांमधून आपल्याला दिसतो. अधिकृत नोंदीनुसार संविधानाच्या पंधराव्या भागात शिवाजी महाराज आणि गुरू गोविंदसिंग यांचे चित्र आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उभी केली आणि संविधानाने त्या स्वराज्याला लोकशाही मूल्यांची संस्थात्मक चौकट दिली. भारतातील सामाजिक विषमता, अस्पृश्यता, अन्याय आणि वंचित घटकांचे प्रश्न संविधानाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला, असेही ते म्हणाले. व्याख्याते स्वानंद बेदरकर यांनी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफतांना संतांचा सामाजिक उपदेश या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी समाजाने प्रत्येक संताला आपल्या प्रमाणे वाटून घेतली आहे ती योग्य नाही, असे सांगितले. भारती लंबांते यांनी सूत्रसंचालन केले. रतन वडघुले यांनी आभार मानेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com