भव्य स्मारक उभारणार

भव्य स्मारक उभारणार
Published on: 
पान दोन ॲंकर ----------------- 35146 धुळे : नगावबारी परिसरात स्थापित करावा या मागणीचे निवेदन आमदार अनुप अग्रवाल यांना देताना देवपूर युवक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी. -- नगावबारीत शिवरायांचे स्मारक उभारणार आमदार अग्रवालांची देवपूर युवक शिवजयंती उत्सव समितीला ग्वाही सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना पुतळा सन्मानपूर्वक स्थलांतरित करून नगावबारी परिसरात स्थापित करावा, अशी मागणी देवपूर युवक शिवजयंती उत्सव समितीने आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे केली. जुना पुतळा स्थलांतरित करणे शक्य न झाल्यास देवपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही अग्रवाल यांनी दिली. मनोहर चित्र मंदिराजवळ जुन्या पुतळ्याच्या जागी नवीन पुतळा उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जुन्या पुतळ्याचे जतन करून त्याची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी तो नगावबारी परिसरात स्थापित करावा, अशी समितीची भूमिका आहे. नंदुरबार व शिरपूरकडून धुळे शहरात प्रवेश करताना नगावबारी हा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे स्मारक उभारल्यास शहराच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख मिळेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, शौर्य, न्याय व जनकल्याणाचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असे समितीने म्हटले आहे. समितीचे अध्यक्ष योगेश गोसावी यांच्यासह कृपेश नांद्रे, योगेश पाटील, मिथुन अहिरराव, कल्पेश थोरात, अमोल सूर्यवंशी, तेजस सोनवणे, संजय वैजारी, पुष्कर सोनार, प्रथमेश येवले, देवेश ठाकूर, पुष्कराज मोरे, नीलेधर निकम, शैलेश पोतदार, योगेश पगारे, बलदेव चत्रे, स्वप्नील सोनवणे, धीरज चौधरी, मुन्ना भावसार, दिनेश महाले, शुभम महाले, नीलेश चौधरी, मयूर चौधरी, प्रथमेश पाटील, पियूष चव्हाण, पियूष देव, शुभम माळी, हर्षल चौधरी, कुलदीप ठाकूर, दर्शन सोनवणे, कैलास मराठे, अंकित देसले, गौरव पंचभाई, प्रतीक सोनवणे व दर्शन कढरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.