गोसराणे–जयपूर शिवपानंद रस्ता वादाच्या भोवऱ्यात; ५०० मीटर रस्ता खोदल्याचा शेतकऱ्यांचा आरोप!

गोसराणे–जयपूर शिवपानंद रस्ता वादाच्या भोवऱ्यात; ५०० मीटर रस्ता खोदल्याचा शेतकऱ्यांचा आरोप!
Published on: 
पान दोन सेकंड मेन --------------- 09904 कळवण : रस्ता खोदल्यामुळे बंद झालेला शिवपाणंद रस्ता पाहताना बाधित शेतकरी व ग्रामस्थ. गोसराणे-जयपूर शिवपाणंद रस्ता वादाच्या भोवऱ्यात; रस्ता खोदल्याने शेतकऱ्यांची वाहतूक ठप्प; उपोषणाचा शेतकऱ्यांचा इशारा सकाळ वृत्तसेवा कळवण, ता. १८ : गोसराणे-कनाशी रस्त्यापासून जयपूर रस्त्याला जोडणारा सुमारे एक किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा शिवपाणंद रस्ता सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या ६० वर्षांपासून शेतीच्या ये-जा व वाहतुकीसाठी नियमित वापरात असलेल्या या रस्त्यापैकी सुमारे ५०० मीटर रस्ता एका शेतकऱ्याने खोदून त्यावर अतिक्रमण केल्याचा गंभीर आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. या मनमानी प्रकारामुळे लगतच्या शेतकऱ्यांची शेतीची वाहतूक ठप्प झाली असून, एका कुटुंबाचा घराकडे जाण्याचा मार्गही बंद होण्याची वेळ आली. अशोक शिरसाठ यांनी संबंधित रस्त्याचा काही भाग खोदून त्यावर अतिक्रमण केले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच शिवपाणंद रस्त्याबाबत वाद निर्माण झाला होता. २००३ मध्ये तत्कालीन तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण करण्यासाठी हा रस्ता खुला करून दिल्याचा दाखला शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यानंतर गोसराणे ग्रामपंचायतीनेही या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्याला मंजुरी मिळवली होती. मात्र, आता अचानक रस्त्याचा मोठा भाग खोदण्यात आल्याने पूर्वीच्या निर्णयांचे आणि मंजुरीचे पुढे काय झाले, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, येत्या चार दिवसांत कळवणचे प्रांताधिकारी, तहसीलदार आणि भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शिवपाणंद रस्ता पूर्ववत खुला करावा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन म्हणून आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा सज्जड इशारा बाळासाहेब मोरे, मनीषा मोरे, शांताराम मोरे, गोपीनाथ साबळे, गोकूळ ठाकरे, तुषार मोरे आदींसह आक्रमक झालेल्या शेतकरी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ----- कुटुंबाचा मार्ग बंद; मोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह या रस्त्याचा प्रश्न केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर रस्त्यालगत घर असलेल्या एका कुटुंबाला ये-जा करण्यासाठी सुटकाही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. लहान मुलांना शाळेत पोहोचवितानाही पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तक्रारदार शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सदर परिसरातील अर्थे शिवाराचा काही भाग गोसराणे हद्दीत, तर काही भाग जयपूर हद्दीत येतो. संबंधित जमिनीची मोजणी करताना लगतच्या शेतकऱ्यांना पूर्वसूचना देणे, नोटीस बजावणे आणि त्यांचे आक्षेप विचारात घेणे कायदेशीररीत्या आवश्यक असताना, भूमिअभिलेख कार्यालय, कळवण यांनी ही एकतर्फी मोजणी कशी केली, असा मोठा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. महसूल विभाग आणि भूमिअभिलेख विभागाच्या कथित निष्काळजीपणामुळेच हा वाद अधिक बिकट झाल्याचा आरोप होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.