Nashik News : नाशिकमध्ये ‘गोष्ट इथे संपत नाही’; मराठ्यांच्या शौर्यगाथांचा थरार
Two-Day ‘Shivcharitra’ Program Brings History Alive in Nashik : नाशिकमध्ये २८ व २९ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘शिवचरित्र’ सादरीकरणाचा कार्यक्रम रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित; ‘पन्हाळा ते पावनखिंड’ व ‘आग्र्याहून सुटका’ या झंझावाती प्रसंगांचे रंगमंचीय दर्शन.
नाशिक- छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल, आदिलशाही आणि इतर सत्ताधीशांविरुद्ध लढा देऊन अनेक लढाया जिंकल्या. जिगरबाज मावळ्यांच्या साथीने कधी थेट, तर कधी गनिमी काव्याने अनेक गड-किल्ल्यांवर अटकेपार झेंडे लावले. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.