शिवप्रताप दिन साजरा

शिवप्रताप दिन साजरा
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... --- फोटो क्रमांक : 35009 सोनगीर (ता. धुळे) : सुवर्णगिरी किल्ल्यावर शिवप्रताप दिनानिमित्त नवीन भगवा ध्वज फडकवून शिवप्रतिमेचे पूजन करताना उपस्थित शिवप्रेमी. --- सुवर्णगिरी किल्ल्यावर शिवप्रताप दिन उत्साहात नवीन भगवा ध्वज, शिवप्रतिमेचे पूजन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १४ : सोनगीर (ता. धुळे) येथे असलेल्या ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ल्यावर दिवाळी पर्वाचे औचित्य साधत शिवप्रताप दिन उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात साजरा करण्यात आला. १० नोव्हेंबर १६५९ ला किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेल्या शौर्याचे आणि पराक्रमाचे स्मरण करत उपस्थित शिवप्रेमींनी इतिहासाला उजाळा दिला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘हर हर महादेव’च्या गगनभेदी घोषणांनी किल्ला परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमात किल्ल्यावर नवीन भगवा ध्वज आणण्यात आला. नंतर शिवप्रतिमेचे विधिवत पूजन करून दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. दीपावलीच्या आनंदासोबतच शिवप्रेमींनी हा उपक्रम राबविला. ईश्वर पाटील, दिनेश ठाकूर, अनिल पवार यांच्या पुढाकाराने उपक्रम झाला. शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव, संजय पाटील, गोकुळ पाटील, संदीप पवार, नितीन पाटील, दीपक देवरे, दत्तात्रय पाटील, मयूर पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.