Agriculture Minister Shivraj Singh Chouhan
sakal
नाशिक: देशातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार केंद्र सरकारचे कृषी मंत्रालयाबरोबर सिंचन, पशुपालन असे पूरक विभाग आणि देशातील कृषी विज्ञान केंद्रे कटिबद्ध आहेत. विकसित भारत ‘जी रामजी’ योजनेतून शेतीला पूरक कामे प्राधान्याने केली जातील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले.