Shivrajyabhishek 2023 : हिंदुस्थानचे सार्वभौम राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता. ही घटना संपूर्ण हिंदुस्थानासाठी अभिमानास्पद आहे. याच भावनेतून दरवर्षी रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे राज्याभिषेक सोहळा थाटामाटाने साजरा करण्यात येतो. यंदा या ऐतिहासिक सोहळ्याचे ३५० वे वर्ष आहे.
या निमित्त राज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला ३५० सुवर्ण होनांनी अभिषेक केला जाणार आहे. हे सुवर्ण होन बनविण्याचे काम आणि मान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् या सुवर्णपेढीला लाभला आहे. (Shivrajyabhishek 2023 Chandukaka Saraf gives Shiv Chhatrapati with golden hona coin nashik news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
छत्रपती शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज, कोल्हापुर यांच्या संग्रहात असलेल्या शिवकालीन अस्सल व दुर्मिळ होनावरून या सुवर्ण होनाच्या प्रतिकृती घडविण्यात आलेल्या आहेत. हे ३५० होन घडविण्यासाठी चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स यांनी ३५० ग्रॅम सोन्याचा वापर केला असून मूळ होनासारखी हुबेहुब प्रतिकृती घडविण्यासाठी २५ कारागिरांनी २० दिवस परिश्रम घेतले आहेत.
चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि. चे संचालक सिद्धार्थ शहा यांनी हे सुवर्ण होन रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष तथा लोकोत्सव दुर्गराज रायगड शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे कार्यक्रमात सन्मानपूर्वक सूपूर्द केले.
१९६ वर्षे सुवर्ण परंपरा असलेली चंदुकाका सराफ सुवर्णपेढी, या ऐतिहासिक सोहळ्याशी जोडली जात आहे, हे आमच्यासाठी खूपच अभिमानास्पद आहे, असे मनोगत सिद्धार्थ शहा यांनी व्यक्त केले आहे.
यंदाचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा लक्षात घेऊन चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स् यांनी शिवकालीन दागिन्यांचे ऐतिहासिक व एक्सक्लुझिव्ह ‘हिंदवी’ कलेक्शनसुद्धा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनतेसमोर आणण्याचे ठरविले आहे. ६ जूनला दुर्गराज रायगड येथे होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिद्धार्थ शहा यांनी शिवप्रेमींना केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.