चंद्रकांत पाटलांचं मन लहान मुलासारखं; संजय राऊतांचा चिमटा

shiv sena mp sanjay raut statement chandrakant patil apj abdul kalam
shiv sena mp sanjay raut statement chandrakant patil apj abdul kalam
Summary

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं

नाशिक- शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर भाष्य केलं. संजय राऊतांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे निष्कपट, निष्पाण, निरागस, व्यक्तीमत्व आहेत. लहान मुलांसारखं त्यांचं मन आहे. चंबळ खोऱ्यातील ही लढाई नाही. राजकारणात मतभेद असतात. घरामध्ये मंगल प्रसंग असल्यास आपण शुभेच्छा देत असतो. त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (shivsena sanjay raut criticize bjp chandrakant patil)

चंद्रकात पाटलांवर निशाणा साधताना संजय राऊत म्हणाले की, 'वाघाच्या मिशिला हात लावण्याची कुणाच्यात हिंमत नाही. संजय राऊतांच्या मिशिला हात लावयला हिंमत लागते. मी वाट पाहतोय.' महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये एक संस्कार आहे. शत्रूत्व टोकाचं नसतं. वैचारिक मतभेद असतात, असंही ते म्हणाले. कोरोळा काळात फिरता आलं नाही, बंधनं होती. बंधंन पाळणं गरजेचं होतं. पण, राजकारण थांबत नाही. पक्षसंघटनेला गती देणं आवश्यक आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धव ठाकरे समर्थपणे करत आहेत. त्यामुळे पक्षाची बांधणी आमच्यासराख्या नेत्याची जबाबदारी आहे. पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटणं, त्याचं मत जाणून घेणं, त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. त्सासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार हा दौरा होता, असंही ते म्हणाले.

दीड वर्षात सर्व पदाधिकारी कोरोना काळात सामाजिक कार्य करत होते. यावेळी पक्षसंघटनेकडे जास्त लक्ष देण्यात आलं नाही, कारण कोरोना संकटाकडे लक्ष देणे महत्त्वाचं आहे. आता पक्षसंघटनेला गती देण्यासाठी, तळागळातील कार्यकर्त्यांचे मत जाणून घेण्यासाठी दौरा करत आहे. मुंबई, कोकणसह नाशिक पश्चिम महाराष्ट्राचं शिवसेना पक्षाच्या वाढीमध्ये योगदान मोठं आहे. सत्ता असली तरी प्रश्न कायम असतात. शिवसैनिकांच्या संदर्भात काही निर्णय घेणे आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांशी यावर गेल्यानंतर चर्चा करेन, असं राऊत म्हणाले.

शिवसेनेकडेच पाच वर्ष मुख्यमंत्रिपद

शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष राहील. मुख्यमंत्रीपदाबाबत कसलीटी वाटा-घाटी नाही. पाच वर्ष शेवसेनेकडेच मुख्यमंत्रिपद राहण्याबाबत 'कमिटमेंट' झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये हे स्पष्ट असल्याचं राऊथ म्हणाले. काँग्रेसबाबतच्या चर्चांबाबतही राऊतांनी भाष्ट केलं. काँग्रेसमध्ये कसलीही नाराजी नाही. काँग्रेसमध्ये एकापेक्षा एक सरस लोक आहे. नाना पटोले अशाच सरस लोकांमध्ये येतात. अनेक दावेदार असतात, अनेकांना वाटू शकतं पंतप्रधान व्हावं. आकांक्षा ठेवण्यात गैर काही नाही. तीन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र आले आहेत. पक्ष विलिन झालेले नाहीत, स्वतंत्र आहेत. पक्षसंघटना वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. माध्यमांमध्येच ही बातमी येत आहे, असं ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com