नाशिक- संत कबीरनगर येथे शनिवारी (ता. ८) रात्री पूर्ववैमनस्यातून संशयित टोळक्याने १७ वर्षीय युवकाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी गंगापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन संशयितांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. परिसरात तणाव पसरल्याने येथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.