Real Estate Scam: नाशिक- पाथर्डी परिसरात तत्कालीन लेफ्टनंट कर्नलने खरेदी केलेल्या कोट्यवधींची जमीन संशयित टोळक्याने बनावट कागदपत्रे बनवून तिची परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित विजय शिवाजी कंकाळ व त्याचे काही साथीदार (सर्व रा. चुंचाळे, अंबड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.