Man Creates Own Fake Death Certificate: मालेगाव- शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले काढण्याचे प्रकरण ताजे असताना येथे एकाने स्वत:चे बनावट मृत्यू प्रमाणपत्र काढण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने दोघांना ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकारामुळे पुन्हा मालेगावचे नाव राज्यभर चर्चेत आले.