Nashik Crime: धक्कादायक! कामाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीचे बळजबरी लग्न लावून दिले, सत्य समोर आले तेव्हा...

Crime news
Crime newsesakal

Nashik Crime : नाशिक शहरात लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नाशिक शहरात अल्पवयीन मुलीला केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत तिचे परराज्यात बळजबरीने लग्न लावून देत 80 हजारात या मुलीची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे.

या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमका काय प्रकार घडला होता याबाबत सविस्तर जाणून घेऊया... (Shocking minor girl forced into marriage by lure of work selled for 80 thousand to hyderabad Nashik Crime)

नाशिक शहरात वास्तव्यास असलेल्या एका अल्पवयीन मुलीला केटरिंगच्या कामाचे आमिष दाखवत कर्नाटक येथील एका तरुणाशी बळजबरीने आळंदी येथे लग्न लावून दिले.

मुळात या अल्पवयीन मुलीला फूस लावून 80 हजारात तिचा सौदा कर्नाटक येथील तरुणाशी केला असल्याचं समोर आल. त्यानंतर तिला हैदराबादमध्ये डांबून ठेवले.

मात्र या मुलीने या लोकांना हुशारी दाखवत तुम्ही माझ्या घरी चला माझ्या घरच्यांना सांगा असं सांगत पुण्यात घेऊन आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime news
Pune Crime : ओतूर पोलीसांनी हरवलेले अंदाजे चार लाख रूपयाचे १९ मोबाईल सायबर सेलच्या मदतीने शोधले

यावेळी स्थानिकांनी तिला विचारणा केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटूंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली. सध्या मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संबंधित महिला व तिच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

या लोकांनी आतापर्यंत अशा किती अल्पवयीन मुलींना फसविले आहे याचाही तपास पोलीस करत आहेत. पोलिसांच्या या तपासातून पुढे काय निष्पन्न होत, या मुलीप्रमाणे अजून काही मुलींची विक्री संबधित आरोपींनी केली असल्यास त्यांचा देखील शोध लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे....

Crime news
Crime News: मुंबईत थरकाप उडवणारी घटना; लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com