नाशिक- येथील उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल स्वप्नील विठ्ठल गायकवाड याने आपल्या सहा वर्षांच्या मुलीला गळफास देत हत्या केली आणि नंतर स्वतःही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. मंगळवारी (ता. २४) सायंकाळी सहा- साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कौटुंबिक तणाव आणि नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.