पित्याच्या अंत्ययात्रेवेळी नेमबाज मोनाली गोऱ्हेनेही सोडला प्राण; क्रिडाक्षेत्रात शोककळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

monali gorhe death

श्रीलंका संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून मोनाली यांनी काम केले होते. नाशिकमधील रायफल शूटिंगच्या क्षेत्राचे त्यांच्या निधनामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील शेकडो विद्यार्थी सातपूर येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांच्याकडून धडे गिरवत होते.

नेमबाज मोनाली गोऱ्हेंचे कोरोनाने निधन; नाशिकमध्ये शोककळा

इंदिरानगर (नाशिक) : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोनाने (coronavirus) थैमान घातले असतानाच मृत्यूची संख्याही वाढत आहे. कित्येक दिग्गज कलावंत, राजकीय नेते, खेळाडू आदी या कोरोनाच्या विळख्यात सापडून त्यांना आपले प्राण (corona death) गमवावे लागले आहेत. अशातच नाशिकमधून एक अतिशय ह्रदयाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. पिता-पुत्रीच्या अचानक एक्झिटने नाशिकमध्ये शोककळा पसरली आहे.(shooter-monali-gorhe-died-due-to-corona)

पिता-पुत्रीचे निधन; परिसरात शोककळा

इंदिरानगर येथील रहिवासी जिल्हा परिषदेचे माजी कर्मचारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मनोहर (बापू) गोऱ्हे आणि त्यांची कन्या आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक मोनाली मनोहर गोऱ्हे यांचे (ता.20) निधन झाले. सुरवातीला घरातच त्यांनी क्वारंटाइन करून घेतले होते. त्यानंतर नाशिकरोड येथील खाजगी रुग्णालयात त्या दाखल झाल्या होत्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पदके जिंकली आहेत .

क्रिडाक्षेत्रात नावलौकिक

श्रीलंका संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून देखील त्यांनी काम केले होते. नाशिकमधील रायफल शूटिंगच्या क्षेत्राचे त्यांच्या निधनामुळे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील शेकडो विद्यार्थी सातपूर येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांच्याकडून धडे गिरवत होते. वडिल हे त्या भागातील ज्येष्ठ नागरिक संघांचे संस्थापक सदस्य होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांना मानाचे स्थान होते. नुकतेच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. परंतु संसर्ग झाल्याने पुन्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यात वडिलांचे (ता.19) रात्री निधन झाले. तर त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी घरापासून निघण्याच्या सुमारास मोनाचे देखील निधन झाल्याची बातमी आल्याने संपूर्ण इंदिरानगर परिसरावर शोककळा पसरली. त्यांच्या मागे पत्नी आणि एक विवाहित मुलगी आहे.

हेही वाचा: 'सारथी'तून शाहु महाराजांचे नाव काढा; संभाजीराजे कडाडले!

हेही वाचा: बेवारस रुग्णांचे अंत्यविधी करणारा ‘योद्धा’! शंभरवर मृतदेहांचे पॅकिंग

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CoronavirusCorona Death
loading image
go to top