Shravan 2022 : कपालेश्‍वर मंदिरात बम, बम भोलेचा गजर | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kapaleshwar Mandir latest marathi News

Shravan 2022 : कपालेश्‍वर मंदिरात बम, बम भोलेचा गजर

नाशिक : बम, बम भोलेच्या गजरात पहिल्याच श्रावणी सोमवारचे औचित्य साधत कपालेश्‍वर महादेव मंदिरात भाविकांची पहाटेपासून अलोट गर्दी उसळली होती.

पहाटेच्या काकड आरतीनंतर रात्री बारापर्यंत भाविकांचा उत्साह कायम होता. (Shravan 2022 Bam Bam Bhole chanting in Kapaleswar mahadev temple by devotees nashik Latest marathi news)

देशातील एकमेव नंदी नसलेले शिवालय अशी ओळख असलेल्या कपालेश्‍वर महादेव मंदिरात पहाटे साडेचार वाजता काकड आरती, त्यानंतर पाच वाजता दुग्धाभिषेक करण्यात आला.

दुपारी श्रींना अभ्यंग स्नान झाल्यावर परिसरातून काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याचा आनंदही भाविकांनी घेतला. पहिलाच सोमवार असल्याने पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत मंदिरात दर्शनासाठी तोबा गर्दी उसळली होती.

दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाविकांना रामकुंडाकडील पायऱ्यांकडून दर्शनाला जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

तर, मुख्य मंदिरात दक्षिण दरवाजाने प्रवेश तर उत्तर दरवाजाने बाहेर पडण्याचा मार्ग निश्‍चित करण्यात आला होता. त्यामुळे सर्वांनाच दर्शन घेणे सुलभ झाले. या काळात पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा: जिद्द : मंडप व्यवसायातून कुटुंबासाठी उभ्या राहिल्या सुरेखाताई

रस्ते बंदिस्त

श्रावणी सोमवारमुळे कपालेश्‍वर, रामकुंड परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी मालेगाव स्टॅन्ड, खांदवे सभागृह, साईबाबा मंदिर आदी भागात रस्ते बंदीस्त केले होते. तसेच मंदिर परिसरात चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे गर्दी टळून सर्वांनाच दर्शन घेणे सुलभ झाले.

तपोवनात गर्दी

तपोवनातील संत जनार्दन स्वामी आश्रमातील श्री शर्वायेश्‍वर महादेव मंदिरासह, तीळभांडेश्‍वर, निळकंठेश्वर, नारोशंकर, घारपुरे घाटातील शंकराच्या मंदिरासह रोकडोबा पटांगणावरील नवसाला पावणाऱ्या व जागृत देवस्थान समजल्या जाणाऱ्या उघड्यावरील शिवलिंगाच्या दर्शनासाठी दिवसभर तोबा गर्दी उसळली होती.

प्रसाद, फराळाचे वाटप

श्रावणी सोमवारचे औचित्य साधत अनेक भाविकांनी कपालेश्‍वर, रामकुंड परिसरात केळी, राजगिरा लाडू आदींचे वाटप करत पुण्य पदरात पाडून घेतले. याशिवाय अनेकांनी भाविकांना उपवासाच्या खिचडीचे वाटप केले.

भगवान शिव शंकराला प्रिय असलेल्या बेलाच्या पानांना मोठी मागणी होती. अनेक विवाहेच्छूांसह शंकराला १०८, १००८ बेलाची पाने वाहण्याचा संकल्प करण्यात आला होता. आदिवासी भागातून मोठ्या प्रमाणावर बेलविक्रेते शहरात दाखल झाले आहेत. सर्वच लहानमोठी शिवालये गर्दीने फुलून गेली होती.

हेही वाचा: पाकिस्तान अन् इराणमधील कांद्यावर पावसाची ‘संक्रांत’

Web Title: Shravan 2022 Bam Bam Bhole Chanting In Kapaleswar Mahadev Temple By Devotees Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top