नाशिक: श्रावणमासाला प्रारंभ झाला असून, पहिला श्रावण सोमवार (ता. २८) आहे. शहरातील शिव मंदिरांमध्ये श्रावणमासात भाविकांची गर्दी होत असते. गोदाघाटावरील श्री कपालेश्वर मंदिरातही लाखो भाविकांची गर्दी होते. भाविकांची वाहतुकीमुळे गैरसोय होऊ नये या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व शनिवारी श्री कपालेश्वर मंदिर व गंगाघाट परिसरात सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल केल्याची अधिसूचना शहर पोसिस वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.