फोटो -16131
मालेगाव : श्रावस्ती प्रकल्पाचे अनावरण करताना पदाधिकारी
----
नालंदा बुद्ध विहार समितीच्या
श्रावस्ती’ प्रकल्प फलकाचे अनावरण
मालेगाव, ता. २१ : चंदनपुरी येथील नालंदा बुद्ध विहार समितीच्या ‘श्रावस्ती’ प्रकल्पाच्या फलकाचे अनावरण झाले. यानिमित्त कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची १२४ वी, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची ९५ वी व भंते ज्ञानरत्न यांची ९४ वी जयंती निमित्ताने प्रतिमापूजन झाले. समितीचे अध्यक्ष कुमारगुप्त शिवाजी मुनवर यांनी ‘श्रावस्ती’ प्रकल्पाची संकल्पना व विकास आराखडा मांडला. प्रकल्पांतर्गत ‘प्रज्ञा संकुलात’ वस्तीशाळा, मुक्त ग्रंथालय, अध्ययन केंद्र व अभ्यासिका, तर ‘करुणा संकुलात’ वृद्धाश्रम, अनाथाश्रम व वसतिगृह उभारण्यात येणार आहे. याशिवाय नवीन बुद्ध विहार इमारतीचाही प्रकल्पात समावेश असून, ऑक्टोबर २०३६ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुनवर यांनी सांगितले. माजी सरपंच राजेंद्र पाटील, उपनिरीक्षक गौतम तायडे, मुख्य अग्निशमन अधीक्षक संजय पवार, संकेत खंडेलवाल, उपसरपंच अशोक अहिरे, मंगलदास वाघ, मनोहर जोपळे, अशोक शेलार, राजाभाऊ सावळे, शांताराम सोनवणे, भगवान किसान पवार, रवींद्र अहिरे उपस्थित होते. मधुकर केदारे यांनी सुत्रसंचालन केले. संयोजन कपिल अहिरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.