धुळ्यात ११ ऑक्टोबरपासून ‘श्रीदुर्गामाता दौडी’चे आयोजन
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नियोजन; विजयादशमीला निघणार महादौड
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : राष्ट्राभिमान, देशभक्ती आणि धार्मिक भावनांचा जागर करण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे धुळे महानगर, देवपूर विभाग आणि ग्रामीण भागात नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान भल्या पहाटे ‘श्रीदुर्गामाता दौडी’चे आयोजन करण्यात आले आहे. २०१५ सालापासून अविरत सुरू असलेल्या या परंपरेत यंदाही नागरिकांनी भगवा फेटा किंवा पांढरी वारकरी टोपी परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
भारतमाता आणि श्रीदुर्गामाता एकच असून, नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजावी आणि बालशिवबांच्या जन्माच्या वेळी जिजामातेने श्रीभवानीमातेकडे देशाच्या व धर्माच्या रक्षणासाठी जे मागणे मागितले होते, तेच मागणे भारतमातेच्या सुख-समृद्धीसाठी भगवतीच्या चरणी मागणे हा या दौडीमागील मुख्य उद्देश आहे. घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच रविवारी (दि. ११ ऑक्टोबर) सकाळी ठीक ६ वाजता श्रीराम मंदिर, विटाभट्टी परिसरातून या दौडीचा प्रारंभ होणार आहे. नवरात्राचे नऊ दिवस शहर, देवपूर व ग्रामीण भागातील विविध भागांतून दौड काढण्यात येणार असून, विजयादशमीला (दसरा, दि. २० ऑक्टोबर) सर्व भागांतील दौडी एकत्र येऊन आग्रा रोडवरील शिवस्मारकापासून भव्य ‘श्रीदुर्गामाता महादौड’ काढण्यात येणार आहे.
दौडीसंदर्भात अधिक माहितीसाठी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख संजय रामेश्वर शर्मा (मो. ९४०५८४३८६७) किंवा तालुकाप्रमुख शुभम बागूल (मो. ९५०३४४४३३२) यांच्याशी संपर्क साधावा.
दौडीचे मार्ग व नियोजन पुढीलप्रमाणे
१. धुळे शहर विभाग :
पहिली दौड (रविवार, ११ ऑक्टोबर) : श्रीराम मंदिर, विटा भट्टी परिसर
दुसरी दौड (सोमवार, १२ ऑक्टोबर) : सुभाषचंद्र बोस चौक, जुने धुळे
तिसरी दौड (मंगळवार, १३ ऑक्टोबर) : श्री स्वामी समर्थ मंदिर, मिल परिसर
चौथी दौड (बुधवार, १४ ऑक्टोबर) : श्री शंभूतीर्थ, सावरकर स्मारक
पाचवी दौड (गुरुवार, १५ ऑक्टोबर) : पवन नगर, पश्चिम हुडको
सहावी दौड (शुक्रवार, १६ ऑक्टोबर) : मोहाडी उपनगर
सातवी दौड (शनिवार, १७ ऑक्टोबर) : श्री मारुती मंदिर, एस.आर.पी. कॉलनी रिक्षास्टॉप (नकाणे रोड)
आठवी दौड (रविवार, १८ ऑक्टोबर) : श्री विश्वकर्मा नगर
नववी दौड (सोमवार, १९ ऑक्टोबर) : यशवंत नगर, साक्री रोड परिसर
विजयादशमी महादौड (मंगळवार, २० ऑक्टोबर) : शिवस्मारक, आग्रा रोड
१. देवपूर विभाग :
पहिली दौड (रविवार, ११ ऑक्टोबर) : श्रीराम मंदिर, विटा भट्टी परिसर
दुसरी दौड (सोमवार, १२ ऑक्टोबर) : श्रीराम मंदिर, नकाणे गाव
तिसरी दौड (मंगळवार, १३ ऑक्टोबर) : श्री मारुती मंदिर, वाडीभोकर गाव
चौथी दौड (बुधवार, १४ ऑक्टोबर) : श्री शंभूतीर्थ, सावरकर स्मारक
पाचवी दौड (गुरुवार, १५ ऑक्टोबर) : श्री भोलेबाबा मंदिर, नकाणे रोड
सहावी दौड (शुक्रवार, १६ ऑक्टोबर) : नगाव बारी चौफुली, श्री मारुती मंदिर
सातवी दौड (शनिवार, १७ ऑक्टोबर) : श्री मारुती मंदिर, एस.आर.पी. कॉलनी रिक्षास्टॉप (नकाणे रोड)
आठवी दौड (रविवार, १८ ऑक्टोबर) : श्री दत्त मंदिर चौक, देवपूर
नववी दौड (सोमवार, १९ ऑक्टोबर) : यशवंत नगर, साक्री रोड परिसर
विजयादशमी महादौड (मंगळवार, २० ऑक्टोबर) : शिवस्मारक, आग्रा रोड
१. महिलांची स्वतंत्र दौड :
पहिली दौड (रविवार, ११ ऑक्टोबर) : श्रीराम मंदिर, विटा भट्टी परिसर
दुसरी दौड (सोमवार, १२ ऑक्टोबर) : श्रीराम मंदिर, नकाणे गाव
तिसरी दौड (मंगळवार, १३ ऑक्टोबर) : श्री मारुती मंदिर, वाडीभोकर गाव
चौथी दौड (बुधवार, १४ ऑक्टोबर) : ध्वज चौक, मिल परिसर
पाचवी दौड (गुरुवार, १५ ऑक्टोबर) : तिरुपती नगर
सहावी दौड (शुक्रवार, १६ ऑक्टोबर) : नगाव बारी चौफुली, श्री मारुती मंदिर
सातवी दौड (शनिवार, १७ ऑक्टोबर) : शिवस्मारक, पारोळा रोड
आठवी दौड (रविवार, १८ ऑक्टोबर) : भोई सोसायटी
नववी दौड (सोमवार, १९ ऑक्टोबर) : जुने धुळे परिसर
विजयादशमी महादौड (मंगळवार, २० ऑक्टोबर) : शिवस्मारक, आग्रा रोड
---