धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 33140
धुळे : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे झालेल्या श्री दुर्गामाता महादौडीत हाती भगवा ध्वज घेत सहभागी झालेले तरूण.
--
धुळ्यात जयघोषात दुर्गामाता महादौड
-
ध्वजासह भगवे फेटे परिधानातून तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
-
किंवा
-
धुळ्यात श्री दुर्गामाता महादौड
-
भगवे फेटे परिधानातून तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २० : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धुळे विभागातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. २०) पहाटे श्री दुर्गामाता महादौड पार पडली. भगवे फेटे आणि वारकरी टोप्या परिधान केलेले तरुण, धर्मप्रेमी या दौडीत सहभागी झाले. ‘भारतमाता की जय’ आणि ‘श्री दुर्गामाता की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
आग्रा रोडवरील मनोहर चित्र मंदिराजवळील श्री शिवछत्रपती स्मारकापासून पहाटे दौडीला प्रारंभ झाला. तेथून ही दौड आग्रा रोड, श्रीराम मंदिर, फुलवाला चौक, मोठा पूल, बापू भंडारी गल्ली, श्री एकवीरादेवी मंदिर, पंचवटी परिसर, मोठा पूल, गोल चौकी, सुभाष चौक, गल्ली क्रमांक सात, भांग्या मारुती चौक, माधवपुरा चौक, रामभाऊ दाढीवाला खुंट, गल्ली क्रमांक पाच आणि श्री तुळजाभवानी मंदिर या मार्गाने पुढे गेली.
श्री एकवीरादेवी मंदिरात महाआरती करण्यात आली. नंतर विविध मार्गे जात या दौडचा पुन्हा श्री शिवछत्रपती स्मारक येथे समारोप झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रभक्तीचे विचार तरुणांमध्ये रुजविणे, तसेच त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. हाती भगवे ध्वज घेऊन सहभागी झालेल्या शिवभक्तांमुळे संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.