टुडे १, ॲन्कर
----
NSK26H31335
जळगाव : गणानाम् सत्संग परिवारातर्फे झालेल्या श्री गजानन विजयग्रंथ सामूहिक पारायणाच्या दोन दिवसीय सोहळ्यात महाराजांची मूर्ती, पादुकांची सजावट.
----
NSK26H31336 (विद्याताई पडवळ)
------
श्री गजानन विजयग्रंथाच्या सेवेत तीन दशकांपासून समर्पित
उपशीर्षक
विद्याताई पडवळ : देशविदेशात तेराशे सामूहिक पारायण सोहळे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ४ :
जेथें गजानन चरित्राचा । पाठ होईल नित्य साचा॥
तेथें वास लक्ष्मीचा। चिरकाल होईल हो..॥
श्री गजानन महाराजांच्या विजयग्रंथातील फलश्रुतीची प्रचिती देणाऱ्या या ओवी.. लाखो भक्तांची महाराजांवर श्रद्धा आहे. महाराजांनी या भक्तांना त्यांच्या सेवा नेमून दिल्या आहेत. त्या सेवेचाच भाग म्हणून महाराजांच्या जाहीर पारायणांची मालिका घडून येतेय.. या सेवेतून मिळणारा आनंद वेगळाच आहे, तो इतर भक्तांनाही मिळावा म्हणून पारायणाच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतले आहे, असे मत महाराजांच्या भक्त ठाण्यातील विद्याताई पडवळ यांनी व्यक्त केले.
जळगावात श्रीमती पडवळ यांच्या उपस्थितीत श्री गजानन विजयग्रंथाच्या दोन दिवसीय सामूहिक पारायण सेवेचा उपक्रम पार पडला.. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी ‘सकाळ’शी या ग्रंथाच्या पारायणासंबंधी चर्चा केली. श्री गजानन विजयग्रंथातील सर्व २१ अध्याय मुखोद्गत असलेल्या विद्याताई पडवळ गेल्या साडेतीन दशकांपासून महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर आणि विदेशातही सामूहिक पारायणाचे कार्यक्रम करीत आहेत.
विजयग्रंथाची कथाकथन शैली
विजयग्रंथ व त्याच्या पारायणाबद्दल बोलताना विद्याताई पडवळ सांगतात, १९८९ पासून मी या विजयग्रंथाचे पारायण सुरू केले. सुरवातीला नित्यनियम म्हणून आणि पारायण केले, नंतर या विजयग्रंथाशी अक्षरश: एकरुप झाली. एकामागून एक पारायणं होत गेली आणि महाराजांच्या कृपेने संपूर्ण ग्रंथ तोंडपाठ झाला. या ग्रंथात व्यक्तींमधील संवाद आहेत, महाराजांचे उपदेश आहेत. काही घटना- कथा आणि प्रसंगही आहेत. त्यामुळे ग्रंथातील प्रत्येक अध्याय कथाकथनाच्या स्वरुपात सादर करण्याची वेगळी शैली मी विकसित केली. भक्तांनाही ती आवडली. आणि मग, या शैलीनुसारच पारायणाची मालिका सुरू झाली.
देश-विदेशांत कार्यक्रम
महाराष्ट्रासह बंगळुरु, हैदराबाद, वडोदरा (बडोदा) अन्य प्रांतात आणि विदेशातही विजयग्रंथाचे सार्वजनिक कार्यक्रम होऊ लागले. १५ जानेवारी २०१२ ला पहिल्यांदाच विदेशात न्यू जर्सी येथे तेथील भक्तांनी हा कार्यक्रम घेतला. नंतर अमेरिका, कॅनडा, सिंगापूर येथेही कार्यक्रम झालेत. आतापर्यंत विदेशांत १२४ तर एकूण १२९६ सामूहिक पारायणाचे कार्यक्रम झालेत. यादरम्यान, अमरावती येथे २१ जानेवारी २०१८ला ५२ हजार भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक पारायणाचा भव्य सोेहळा पार पडला, त्याची ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद झाल्याचे विद्याताई म्हणाल्या.
नियमित पारायणाने भक्त आता या ग्रंथाशी एकरुप, समरस झालेत. प्रत्येक वेळा हा ग्रंथ आपल्याला वेगळी अनुभूती देतो, असा दावाही त्यांनी केला. जळगावातील गणानाम् सत्संग परिवाराचे छोटू नेवे व त्यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.
----------