‘श्री खोडाई माता’ यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

‘श्री खोडाई माता’ यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
Published on: 
(टुडे पान एक मेन लिड) फोटो : NSK26H31910 नंदुरबार : यात्रेसाठी दाखल झालेले झुले, पाळणे. फोटो : NSK26H31912 नंदुरबार : मंदिराला करण्यात येत असलेली रंगरंगोटी. फोटो : NSK26H31916 नंदुरबार : खोडाई मातेची मनमोहक मूर्ती. ------------------ ‘श्री खोडाई माता’ यात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ यात्रोत्सवाला २५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा : प्रशासन सज्ज सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १० : शहराचे आराध्य दैवत आणि संपूर्ण खान्देशसह गुजरात व मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खोडाई माता यात्रोत्सवाला आजपासून (ता. ११) प्रारंभ होत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून दरवर्षी आयोजित होणाऱ्या या यात्रोत्सवासाठी खान्देशातील भाविक लाखोंच्या संख्येने सहभागी होत असतात. या यात्रोत्सवाला सुमारे २५० वर्षांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली असून मंदिर ट्रस्टतर्फे यात्रेची संपूर्ण तयारी पुर्ण झाली आहे. मंदिराला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून, परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघाला आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासूनच देवीच्या दर्शनासाठी पहाटे भाविकांच्या मोठमोठ्या रांगा लागत असतात. ------- ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा सामाजिक सलोखा आणि परंपरा जोपासणाऱ्या या यात्रोत्सवात देवीच्या पूजेचा पहिला मान आजही स्थानिक आदिवासी बांधवांना दिला जातो. त्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतरच यात्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. यंदा ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या १० दिवसांच्या कालावधीत हा उत्सव साजरा होत आहे. या काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यावसायिकांसह झुले, पाळणे दाखल खोडाई माता यात्रेत लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठीच विविध मनोरंजनाचे स्टॉल्स, खेळणी आणि झुले- पाळण्यांचे मोठे आकर्षण असते. यावर्षीही मनोरंजनाची साधने मोठ्या संख्येने दाखल झाली असून, यासह खेळणी, घरगुती साहित्य, शोभेच्या वस्तू आणि खाद्य पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे उन्हाचे प्रमाण लक्षात घेता रसवंत्या आणि थंड पेयांची दुकानेही थाटण्यात आली आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पार्किंग झोन यात्रेच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मंदिर परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहने पार्किंग करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जगताप वाडी चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डी. आर. हायस्कूल ते संतोषी माता मंदिर रस्ता नो-व्हेहीकल झोन राहणार असून, भाविकांच्या सोयीसाठी जीटीपी कॉलेज मैदान, बीएसएनएल कार्यालय परिसरात स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चोख पोलिस बंदोबस्त यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी संपूर्ण मंदिर परिसर आणि यात्रा मैदानावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, नगरपालिकेतर्फे पिण्याच्या पाण्याची सोय, तात्पुरती शौचालये आणि २४ तास आरोग्य पथक यात्रा परिसरात सज्ज ठेवण्यात आले आहे. भाविकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर ट्रस्ट व प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com