चांदोरी- गोदावरीच्या तीरावरील चांदोरी येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात रविवारी (ता. ६) श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, या उत्सवात बारा बलुतेदार समाजबांधव सक्रिय सहभागी झाल्याने सामाजिक एकीचे दर्शन घडून आले.