आता घरबसल्या पाहता येणार वहनांचे लोकेशन

आता घरबसल्या पाहता येणार वहनांचे लोकेशन
Published on: 
टुडे एक, ॲंकर NSK26H34801 जळगाव : श्रीराम वहनोत्सवातील वहनांवर असलेल्या जीपीएस यंत्रणेचा क्यूआर कोड. ---- आता घरबसल्या पाहता येणार वहनांचे लोकेशन श्रीराम वहनोत्सवात प्रथमच ‘जीपीएस’चा वापर; क्यूआर कोड स्कॅन मिळणार माहिती सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ९ : जळगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू असलेल्या श्रीराम वहनोत्सवाला मंगळवारपासून (ता. १०) सुरुवात होत आहे. यंदाच्या वहनोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भाविकांना आता वहन शोधण्यासाठी गर्दीत फिरण्याची गरज भासणार नाही. विनोद त्रिपाठी यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच वहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. वहनावरील क्यूआर कोड स्कॅन करताच ते नेमके शहराच्या कोणत्या भागात आहे, याचे लोकेशन मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या किंवा शहरातील कोणत्याही ठिकाणाहून वहनाचा मागोवा घेता येणार आहे. श्रीराम मंदिर संस्थानतर्फे दरवर्षी कार्तिक महिन्यात श्रीराम वहनोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात घोडा, हत्ती, वाघ, सिंह, श्री सरस्वती, चंद्र, गजेंद्र मोक्ष, श्री सूर्य, श्री गरुड आणि श्री मारुती अशा विविध वहनांची मिरवणूक निघणार आहे. दररोज सायंकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत वहनांचे लोकेशन जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे. वहनाच्या वरच्या भागातील एका कप्प्यात ही यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यावरील क्यूआर कोड स्कॅन करून भाविकांना लोकेशन पाहता येईल. रथोत्सव आणि रासक्रीडा वहनालाही जीपीएस येत्या २१ नोव्हेंबरला कार्तिकी प्रबोधिनी एकादशीनिमित्त श्रीराम रथोत्सव साजरा होणार आहे. या रथालाही जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार असून, दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत रथाचे लोकेशन पाहता येईल. त्यानंतर २२ नोव्हेंबरला द्वादशीनिमित्त निघणाऱ्या रासक्रीडा वहनालाही ही सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे १० ते २२ नोव्हेंबर या कालावधीत उत्सवातील विविध वहनांचे लोकेशन भाविकांना मोबाईलवरून पाहता येणार आहे. चौकट मागील वर्षी रथाला होते जीपीएस गेल्या वर्षी केवळ श्रीराम रथाला जीपीएस यंत्रणा लावण्यात आली होती. यंदा मात्र उत्सवातील नियमित वहनांवरही प्रथमच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तंत्रज्ञानाची जोड देत धार्मिक परंपरा अधिक सुलभ करण्याचा हा उपक्रम ठरणार असून, भाविकांना गर्दी आणि वेळेचे नियोजन करून वहनांचे दर्शन घेणे शक्य होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.