Shriram Mahotsav: श्रीराम महोत्सवाचा चित्रकला स्पर्धा, नादब्रह्मने समारोप; स्पर्धेत 379 स्पर्धकांचा सहभाग

Shriram Mahotsav
Shriram Mahotsavesakal
Updated on

Shriram Mahotsav : पर्यटन संचालनालयातर्फे दोनदिवसीय श्रीप्रभू राम महोत्सवाचा नादब्रह्म सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात समारोप झाला.

रविवारी (ता. १३) महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सर्व गटातील ३७९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. (Shriram Mahotsav painting competition concluded by Nadabrahman 379 contestants participated in competition nashik)

पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेचे उद्‍घाटन करण्यात आले. केटीएचएम महाविद्यालय परिसरातील कर्मवीर रावसाहेब थोरात हॉलमध्ये झालेल्या चित्रकला स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना मधुमती सरदेसाई राठोड यांनी मार्गदर्शन केले.

श्रीगोंदा उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, उपअभियंता (पर्यटन) ज्ञानेश्वर पवार, उपलेखापाल हरी जाधव, सहाय्यक चेतना जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सायंकाळी नादब्रह्म सांस्कृतिक कार्यक्रमात सामूहिक रामरक्षा मंत्राचे पठण भोसला स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केले. डॉ. सुमुखी अथणी यांनी बालराम यांच्यावरील प्रसंग सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

श्रीराम जन्मोत्सवाचा प्रसंगाचे विद्यार्थिनींनी सादरीकरण करत वातावरण भक्तिमय केले. मुझोफ्रिक म्युझिक स्कूल टीमने नादब्रह्म कार्यक्रम सादर केला. उपस्थिताना रामायण सर्किट डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shriram Mahotsav
Meri Mitti Mera Desh Campaign: अमळनेर शहर रोषणाईने उजळले! नगरपलिकेतर्फे विविध उपक्रम

भक्तिमय संगीताचे कलाकारांनी सादरीकरण करून नादब्रह्म कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

बाळकृष्ण नगरकर, योगिता पाटील यांनी परीक्षण केले. श्रीराम महोत्सवाला लोकप्रतिनिधींसह शासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही पाठ फिरविली.

चित्रकला स्पर्धेतील विजेते असे

गट ‘अ’ - कौस्तुभ पाटील (प्रथम), विवान पवार (द्वितीय), आद्या पाचपुते (तृतीय). गट ‘ब’ - विनीत विसपुते (प्रथम), रघुवीर भिंगारकर (द्वितीय), आदित्य देवरे (तृतीय). गट ‘क’- पार्थ बरडे (प्रथम), वरद गोडसे (द्वितीय), केतन वाघ (तृतीय). गट ‘ड’ - प्रदीप कातारे (प्रथम), कार्तिक ( द्वितीय), देविका विधाते (तृतीय). उत्तेजनार्थ विद्यार्थी : अद्विती शिनकर, तनू गिरी, समृद्धी ताजणे.

Shriram Mahotsav
Success Story : घरची जबाबदारी, संसार-मुलं सांभाळत तब्बल 18 वर्षांनंतर सविता शिंदेंचं 'वर्दी'चं स्वप्न झालं पूर्ण!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com