शिरपूर : बससेवा बातमी

शिरपूर : बससेवा बातमी
Published on: 
शिरपूर आगारातून जादा बसचे नियोजन शिरपूर, ता. ३ : दीपावलीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिरपूर आगारातर्फे ४ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रासह गुजरातमधील विविध शहरांसाठी जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सुरत, बडोदा आणि अहमदाबादसह विविध मार्गांवर या बसेस धावणार आहेत, अशी माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी दिली. धुळे विभागाचे विभाग नियंत्रक पुरुषोत्तम व्यवहारे आणि विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा यांच्या मार्गदर्शनाखाली बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शिरपूर आगारातून पुणे, नाशिक, अलिबाग, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव, चोपडा, शहादा, धुळे, सुरत, अंकलेश्वर, बडोदा आणि अहमदाबाद या मार्गांवर जादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे दीपावलीच्या सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ई- व्ही वातानुकूलित बसची सुविधा शिरपूर आगारातून ऑक्टोबर महिन्यापासून ई- व्ही वातानुकूलित बस सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय शिरपूर ते बोराडी, मालकातर, पानसेमल तसेच शिरपूर ते आढे, थाळनेर, मांजरोद आणि होळनांथा या मार्गांवर परिसर बससेवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील आणि स्थानक प्रमुख मनोज पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.