गिरणा पंपिगरोड परिसरात चोरीचे सत्र सुरूच

गिरणा पंपिगरोड परिसरात चोरीचे सत्र सुरूच
Published on: 
मेनफिचर शहर टुडे पान चारसाठी ---------- (पोतडी घेऊन जाणाऱ्या चोरट्यांचे संग्रहित चित्र वापरावे) --------------------- गिरणा पंपिगरोड परिसरात चोरीचे सत्र सुरूच ---- श्यामनगरात आणखी एक घरफोडी, रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १६ : शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरातील श्यामनगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री चार बंद घरे फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला तीन घरफोड्यांची घटना समोर आली होती. त्यानंतर त्याच परिसरातील आणखी एका घरात चोरी झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, बहुतांश घरमालक बाहेरगावी असल्याने चोरीला गेलेल्या ऐवजाचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. सलग चार घरफोड्यांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, अद्याप या घटनांप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. श्यामनगरमधील एकाच परिसरातील तीन घरे बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी १५ नोव्हेंबरला पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास घरफोड्या केल्या. कटरच्या साहाय्याने घरांचे कुलूप, कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून देत कपाटांचे लॉकर उघडले व त्यातील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला. या घटना घडल्यानंतर केवळ एका घरमालकाने घरी परतून पाहणी केली आहे. अन्य दोन घरमालक अद्याप बाहेरगावी असल्याने चोरीचा नेमका तपशील समोर आलेला नाही. चौथी घटना समोर या तीन घरांच्या जवळच पशुपतीनाथ मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या आणखी एका घरातही चोरी झाल्याचे सोमवारी निदर्शनास आले. त्यामुळे एकाच रात्री चार ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केल्याचे स्पष्ट झाले आहे. घरमालक बाहेरगावी असल्याने अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. परिणामी, रामानंदनगर पोलिस ठाण्यात या घटनांबाबत गुन्हा नोंद झालेला नाही. गस्त वाढविण्याची गरज श्यामनगर परिसर हा वाढीव परिसर असून, येथे बहुतांश मोकळी वस्ती आहे. त्यामुळे चोरट्यांना बंद घरे लक्ष्य करणे सोपे जात आहे. त्यामुळे या परिसरात एकाच दिवसात चौथी घरफोडी झाल्याचे घटना समोर आली आहे. यापूर्वी देखील या परिसरात घरफोडी व चारचाकी वाहन चोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यात गेल्या दोन दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.