नाशिक: सिडकोतील अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीने संशयितांनी एकतर्फी प्रेमातून केलेल्या बदनामीमुळे गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे, तर तिसरा संशयित पसार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.