grape farmers
sakal
माडसांगवी: नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील द्राक्षाची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या सिद्ध पिंप्री गावात ७५० हेक्टरवर द्राक्षाची लागवड आहे; परंतु त्यातील ६५० हेक्टर द्राक्षबाग प्रचंड पावसामुळे निष्प्रभ ठरल्याने या भागातील सुमारे २०० हेक्टर बागांवर शेतकऱ्यांनी कुऱ्हाड चालविली आहे. जिल्ह्यातील एखाद्या गावातील एकाच पिकाविरोधातील हे नैराश्य द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यास पुरेसे बोलके ठरावे.