SNR26B23076
सिन्नर ः पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत यश मिळविणाऱ्या मंडळांचा गौरव करताना विठ्ठल उगले, हर्षद देशमुख, ललिता हांडे, शुभम वारुंगसे, अनिल जाधव आदी.
-----------------
गणेशोत्सव स्पर्धेत सिद्धेश्वर मंडळ प्रथम
सिन्नर नगरपरिषदेकडून २२ सामाजिक संस्थांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१३ ः नगर परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास स्पर्धेत सिद्धेश्वर मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. पर्यावरणपूरक उत्सवासोबतच सामाजिक उपक्रम राबविल्याने २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. स्पर्धेत इतर २२ सामाजिक संस्थांचाही गौरव करण्यात आला.
-------------
जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरण करण्यात आले. चंद्रकांत वरंदळ, राजेंद्र चव्हाणके, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, आरोग्य सभापती ललिता हांडे, गटनेते मनोज देशमुख, बांधकाम सभापती उदय गोळेसर, गटनेत्या शोभा जाधव, सभापती कांताबाई जाधव, नगरसेवक शुभम वारुंगसे, सागर कोथमीरे, विजय वरंदळ, नगरसेविका योगिता वरंदळ, अमोल कासार, राजेंद्र पगार, दत्तात्रेय हांडे, हरिभाऊ वरंदळ, ज्ञानेश्वर उबाळे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक मंडळांना ७२ हजार रुपये, घरगुती गणेशोत्सव मंडळांना ६१ हजार रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. मुख्याधिकारी अभिजित कदम यांचे मार्गदर्शन लाभले. गायन, शाहिरी, ऐतिहासिक संशोधन, अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गायक हर्षद गोळेसर, दुहिता गोळेसर, शाहीर स्वप्निल डुंबरे, प्रा. जावेद शेख, संजय गंगावणे यांनाही सन्मानित करण्यात आले. कविता सादरीकरण करण्यात आले. कवी रवींद्र मालुंजकर, प्रशांत केंदळे, किरण भावसार, रवींद्र कांगणे, राजाराम मुंगसे, जावेद शेख यांनी कविता सादर केल्या.
विघ्नहर्ता मंडळास द्वितीय १५ हजार रुपयांचे, सोनचाफा महिला मंडळाला तृतीय ११ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. सप्तशृंगी मित्र मंडळाला चतुर्थ, निर्मलधाम मंडळाला पाचव्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. धनलक्ष्मी, म्हसोबा मित्र मंडळ आणि राजे शिवछत्रपती या तीन मंडळांना उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले.
१६-१
घरगुती आरासमध्ये देसाई प्रथम
घरगुती आरास गणेशोत्सव स्पर्धेत गोकूळ देसाई यांनी प्रथम, आशा देसाई यांनी द्वितीय, राज जाधव तृतीय, सत्यम मुजुमदार यांनी चुतर्थ, हर्षदा देशमुख यांनी पाचवा क्रमांक पटकावला. शाडू मातीच्या मूर्ती निर्मिती स्पर्धेत १४ स्पर्धकांना प्रत्येकी ५०० रुपयांची पारितोषिके देण्यात आली. शाडू मातीच्या मूर्ती निर्मितीची कार्यशाळा घेणाऱ्या शाळांनाही सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २२ सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला.
-------------------