लोगो : नवरात्र चिंतन – ९

लोगो : नवरात्र चिंतन – ९
Published on: 
लोगो : नवरात्र चिंतन – ९ -- फोटो : H32626 सिद्धी देणारी माता सिद्धिदात्री लीड आजचा नववा दिवस; नवरात्रोत्सवाची सांगता होण्याच्या पर्वाला प्रारंभ होतो. नवदुर्गांपैकी आजचे रूप सिद्धिदात्री आहे. सर्व प्रकारच्या सिद्धी भक्ताला देणारी देवी म्हणजे सिद्धिदात्री. मार्कण्डेय पुराणानुसार अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत. ब्रह्मवैवर्त पुराणातील श्रीकृष्ण जन्मखंडात सिद्धींची संख्या अठरा सांगितली आहे. - लक्ष्मीकांत जोशी, नाशिक देवीपुराणात असा संदर्भ येतो की, भगवान शिवांनी भगवती सिद्धिदात्रीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. भगवती सिद्धिदात्रीच्या असीम कृपेने महादेवांचे अर्धे शरीर देवीचे झाले. त्यामुळे त्यांना ‘अर्धनारीनटेश्वर’ म्हणून संबोधले जाते. माता सिद्धिदात्री चतुर्भुज आहे. उजव्या वरच्या हातात गदा आणि खालच्या हातात चक्र आहे. डाव्या वरच्या हातात कमळपुष्प आणि खालच्या हातात शंख आहे. तिचे वाहन सिंह असून ती कमळपुष्पावर विराजमान आहे. तिने रक्तवर्णाची वस्त्रे परिधान केलेली आहेत. पूर्ण निष्ठेने साधना करणाऱ्या साधकांवर ती प्रसन्न होते आणि त्यांना सिद्धींचे वरदान देते. तिच्या कृपेने साधकाला या ब्रह्मांडातील कोणतीही गोष्ट अप्राप्य राहत नाही. यापूर्वीच्या आठ दुर्गांची उपासना करता करता नवव्या दिवशी साधक सिद्धिदात्रीच्या जवळ येतो. साधकाच्या लौकिक आणि पारलौकिक कामना पूर्ण झाल्याचा आनंद त्याला प्राप्त होतो. सिद्धिदात्रीच्या जवळ जाणारा साधक हळूहळू विषयवासनेपासून मुक्त होतो. मातेजवळ प्रसन्नतेने राहावे, हा भाव त्याच्यामध्ये दृढ होतो. आत्मोन्नतीसाठी आणि आपल्यातील सात्त्विक शक्ती विकसित करण्यासाठी नवरात्रीचा काळ खरोखरच श्रेष्ठ आहे. सर्व गुणांनी संपन्न करणाऱ्या भगवती सिद्धिदात्रीचे स्तवन आणि वंदन करताना म्हणूया, सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि। सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी॥

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com