Headphones Side Effects | सावधान...! ‘Headphones' वापराताय?; तिशीत येतेय बहिरेपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Headphones Side Effects

Headphones Side Effects: सावधान...! ‘Headphones' वापराताय?; तिशीत येतेय बहिरेपण

नाशिक : कोरोनामुळे ऑनलाइन एज्युकेशन’, ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पना अस्तित्वात आल्या. कोरोना ओसरताच नियमित शाळा -महाविद्यालये अन्‌ कार्यालये सुरू झालीत. मात्र कोरोना काळात मोबाईलसह ‘हेडफोन’ च्या झालेल्या अतिरेक वापराचे दुष्परिणाम आता पुढे येताहेत. तिशीतील तरुणांमध्ये बहिरेपणाचे दोष आढळून येत आहेत. शालेय-महाविद्यालयीन मुलांची श्रवणशक्ती क्षीण झाल्याची तज्ज्ञांना आढळून आले. (side effects of headphones Deafness comes in thirties at youths nashik latest Marathi News)

शालेय मुलांमध्ये बहिरेपणाचे प्रमाण हे २४ टक्के तर, तरुणाईमध्ये हेच प्रमाण ४८ टक्के असल्याचे बी.एम.जे. हेल्थ नियतकालिकेतील एका अभ्यासातून समोर आले आहे. ‘ऑनलाइन एज्युकेशन’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’ ची अंमलबजावणी दीड ते दोन वर्षे चालली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्ट फोन आले. कार्यालयीन कामकाजासाठी अनेकांना महागडे मोबाईल खरेदी करावे लागले. सारे कामकाज करताना ‘हेडफोनची’ गरज होती.

त्यामुळे बाजारात उपलब्ध विविध स्वरूपाचे ‘हेडफोन्स’ खरेदी करून त्याचा वापर वाढला. मात्र ‘हेडफोन’ च्या अतिरेकी वापरामुळे ध्वनिलहरीचा थेट परिणाम कानातील श्रवण क्षमतेवर झाला. परिणामी, बहुतांश तरुणांमध्ये बहिरेपणाचा त्रास जाणवू लागला आहे. येत्या काळात त्यात आणखी वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.

‘हेडफोन’ च्या ध्वनीलहरीचा विपरीत परिणाम

मोबाईलला ‘हेडफोन’ लावून त्यावरून संवाद साधणे, गाणे ऐकणे यासारख्या सवयी तरुणाईमध्ये आहेत. ‘हेडफोन’ कानामध्ये घट्ट बसतात. त्यामुळे त्यातून येणाऱ्या आवाजाच्या ध्वनीलहरीचा थेट परिणाम कानाच्या श्रवणयंत्रणेवर होतो. श्रवणयंत्रणेची जी आठवी नस असते, ती मेंदूपर्यंत पोहोचते. तिला इजा होण्याची शक्यता बळावते.

ही नस बाधित झाल्यास त्याचा थेट परिणाम श्रवण क्षमतेवर होतो. ‘हेडफोन’ च्या ध्वनिलहरी सामान्य ध्वनी लहरींपेक्षा अधिक पटीने असतात, असे तज्ज्ञ सांगतात. श्रवणासाठी ज्या साधनांचा वापर केला जातो, त्या सुरक्षित आहेत की नाही, याची वेळीच पडताळणी न होण्याने बहिरेपणा वाढतो आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Nashik News : 1 डिसेंबरपासून आयुक्तांचे हेल्मेट सक्तीचे फर्मान; पण हेल्मेट सक्ती मागे घेतलीच कधी?

अशी घ्या काळजी

* मोबाईल फोनवर संवाद साधताना त्यात मर्यादा असावी
* जास्त वेळ मोबाईल कानाला लावून वा हेडफोन लावून बोलणे टाळा
* जास्त वेळ मोबाईलवर बोलायचे असेल तर स्पीकर फोनचा वापर करा
* हेडफोन वापरताना कमी वेळ बोलावे
* शक्यतो हेडफोन टाळावेत

"मोबाईल अथवा ‘हेडफोन'चा वापर करून संवाद साधल्याने त्याचा थेट परिणाम श्रवणयंत्रणेतर्फे मेंदूवर होत असतो. श्रवणयंत्रणेची नस बाधित होऊन बहिरेपणा येतो. ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने होते. अलीकडे ३० ते ३५ वर्षांतील तरुणांमध्ये बहिरेपणा अथवा कमी ऐकू येण्याच्या तक्रारी आहेत." - डॉ. संजय गांगुर्डे, कान, नाक व घसा तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

"ऑनलाइन एज्युकेशन’ मुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये ‘हेडफोन’ चा वापर वाढला. ‘हेडफोन’ च्या अतिवापरामुळे बहुतांशी मुलांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे. अलीकडे तरुणाई ऑनलाइन ‘गेम्स' खेळताना ‘हेडफोन' वापरतात. त्याचा थेट परिणाम श्रवण यंत्रणेवर होऊन ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानात विचित्र आवाज येणे यासारखे त्रास सुरू होता. त्यामुळे ‘हेडफोन' वापरण्यावर मर्यादा असावी. शक्यतो वापरू नये."

- डॉ. नितीन चिताळकर, इएनटी सर्जन, नाशिक

हेही वाचा: Nashik News : किकवी प्रकल्पाला 36 कोटींच्या निधीची अडचण; NMCला वाटा द्यावा लागणार

टॅग्स :NashikSakal