सोने चांदी भाव

सोने चांदी भाव
Published on: 
चांदीच्‍या भावात सहा हजारांची घसरण --- सोनेही उतरले; खरेदीदारांना मोठा दिलासा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३० ः सुवर्ण बाजारात आठवडाभरापासून सोने व चांदीच्या भावात होत असलेली घसरण शुक्रवारी (ता. ३०)ही कायम राहिली. सराफ बाजार सुरू होताच सोने दीड हजाराने, तर चांदीचे भाव तब्‍बल सहा हजार रुपयांनी कमी झाले. यामुळे खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला. आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचा परिणाम सोने व चांदीच्‍या भावावर होत आहे. मागील काही दिवसांपासून भावात सातत्‍याने घसरण होते. मध्‍यंतरी भाव काहीसे वाढले. मात्र, दसऱ्यानंतर भावात सातत्‍याने घसरण सुरू आहे. या आठवड्यातही भावात घसरण सुरू आहे. जानेवारी २०२६ च्‍या तुलनेत सोने व चांदीच्‍या भावात मोठी घट झाली. चांदीच्‍या भावात सहा हजारांची घसरण गुरुवारी (ता. २९) सोन्याचा भाव एक लाख ४२ हजार ८०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता. शुक्रवारी सुवर्ण बाजार खुला झाल्‍यावर सकाळी सोन्‍याचा भाव एक हजार ५०० रुपयांनी कमी होऊन सोने एक लाख ४१ हजार ३०० रुपयांवर आले; तर चांदीचे भाव तब्‍बल सहा हजार रुपयांनी कमी झाले. गुरुवारी एक लाख ९६ हजार (प्रतिकिलो विनाजीएसटी) रुपयांवर असलेली चांदी शुक्रवारी एक लाख ९० हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे. चौकट काही दिवसांतील सोन्या-चांदीचे भाव तारीख---सोने प्रतिदहा ग्रॅम--- चांदी प्रतिकिलो (विनाजीएसटी) २५ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ५००--- २ लाख २ हजार २६ ऑक्टोबर---१ लाख ४२ हजार--- १ लाख ९९ हजार २७ ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ८००--- १ लाख ९७ हजार २८ ऑक्टोबर---१ लाख ४३ हजार--- १ लाख ९८ हजार २९ ऑक्टोबर---१ लाख ४२ हजार ८००--- १ लाख ९६ हजार ३० ऑक्टोबर---१ लाख ४१ हजार ३००--- १ लाख ९० हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.