Kumbh Mela
sakal
नाशिक: प्रयागराज महाकुंभमेळ्यात भाविकांच्या सुरक्षिततेसह पर्यावरणपूरक मेळ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संस्थांनी पुढाकार घेत योगदान दिले. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, सुनियोजित व पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी संघ परिवार आग्रही आहे. सिंहस्थाच्या नियोजनात शासन-प्रशासनाला सहकार्याची भूमिका असेल, अशी ग्वाही संघ पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांना दिली.