नाशिक- नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीस वेग देत, विभागीय आयुक्त व सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या ४ हजार कोटींच्या निविदा तातडीने अंतिम करून कार्यारंभ आदेश द्यावेत, तसेच प्रगतिपथावर असलेल्या २ हजार कोटींच्या निविदा लवकरात लवकर निर्गमित कराव्यात, असे त्यांनी बैठकीत सांगितले.