Simhastha Kumbh Mela
sakal
नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे होत असून, त्यातून शहराची सामाजिक, आर्थिक विकासाला मदत होणार आहे. सुरक्षित कुंभमेळ्यासाठी नियोजन गरजेचे आहे. तसे झाल्यास शहराचा चेहरामोहरा बदलेल. कुंभमेळ्याची कामे करताना एक रुपयाही कमी पडू देणार नाही. कायापालट करून दाखवू, देशभरात नाशिकचा नावलौकिक पोहोचवू. त्यासाठी नाशिककरांनी साथ देण्याचे आवाहन कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केले.