सिंहस्थाची माहिती एका क्लिकवर

सिंहस्थाची माहिती एका क्लिकवर
Published on: 
सिंहस्थाची माहिती एका क्लिकवर कुंभमेळा प्राधिकरणाचे संकेतस्थळ खुले सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ४ : सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातर्फे सिंहस्थ कुंभपर्वाच्या अनुषंगाने संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे सिंहस्थ पर्वात देश-विदेशातून येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना कुंभमेळ्याशी निगडीत सर्व माहिती https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळ सुरु केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसह विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक संस्था, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील घटक आणि प्रसारमाध्यमांसाठी हे संकेतस्थळ माहितीचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. कुंभमेळ्याशी संबंधित माहिती वेगवेगळ्या माध्यमांत शोधण्याऐवजी ती एकाच अधिकृत ठिकाणी उपलब्ध व्हावी, हा या संकेतस्थळामागील मुख्य उद्देश असल्याचे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले. पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, धार्मिक स्थळांची माहिती, प्रवासाचे नियोजन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा व सुरक्षाविषयक सूचनांचा त्यामध्ये समावेश असेल. संकेतस्थळाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येणार असून, त्यात पुढील काळात अधिक माहिती आणि डिजिटल सेवांची भर पडणार असल्याचे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. ---चौकट नियोजन होणार सुलभ सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व, इतिहास, परंपरा, प्रमुख मंदिरे, घाट आणि आखाड्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे पर्याय, तसेच स्थानिक प्रवासासंबंधी माहितीही भाविकांना मिळू शकेल. तसेच स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, निवास व्यवस्था, वाहनतळ आणि मदत कक्षासारख्या सुविधांची माहितीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाईल, असे प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.