Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यात व्हा 'टूर गाइड'; नाशिकच्या तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी!

Tourism Department to Train Local Youth as Tour Guides : सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी नाशिकमध्ये युवकांना ‘टूर गाइड’ म्हणून प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पर्यटन संचालनालयाने हाती घेतला आहे.
tourism jobs

tourism jobs

sakal 

Updated on

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या पर्यटकांना स्थानिक पर्यटन स्थळांची माहिती करून देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत पर्यटन सुलभ मार्गदर्शक (टूर गाइड) तयार करण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना रोजगाराची संधी मिळणार आहे. इच्छुकांनी गुगल लिंकवर सोमवारी (ता. १६) दुपारी दोनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com