जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार
Published on: 
ध्वजारोहण सोहळा विशेष पुरवणी ….. नियोजनातील अनुभव अविस्मरणीय ठरणार लीड सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभागी होण्याची संधी अत्यंत दुर्मीळ मानली जाते. सुदैवाने नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करण्याची मिळाल्याचा अत्यंत आनंद होतो. साधु-महंतांची सेवा, प्रशासकीय सुविधा, भाविकांना येणाऱ्या अडचणी, लोकप्रतिनिधींचे दौरे आदी सर्वांच्या नियोजनातील अनुभव अविस्मरणीय ठरणार आहेत. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील आठवणी व अनुभव पुढील कार्यकाळात उपयोगी ठरेल, असा विश्‍वास वाटतो. आयुष्यभर संस्मरणीय ठरणाऱ्या गोष्टी या काळात शिकण्यास मिळतील, त्यामुळे नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा हा आयुष्यभर स्मरणात राहील. -ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद … सिंहस्थ कुंभमेळ्याचे कार्यक्षेत्र हे जिल्हा परिषदेकडे मोठ्या प्रमाणात आहे. पर्वणी काळातील पार्किंग, पाणीपुरवठा, शौचालये, आपत्ती व्यवस्थापन, महिला बचतगटाच्या माध्यमातून भाविकांना जेवण पुरविले जाणार आहे. महिला बचतगटाच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, कर्मचारी व भाविकांना जेवण पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी सूक्ष्म पद्धतीचे नियोजन सुरू आहे. पण जेवणाची गुणवत्ता उत्तम राखण्यात येईल. कुठल्याही भाविकांना त्रास होणार नाही, या दृष्टीने स्वादिष्ट जेवण पुरविण्यात येणार आहे. नाशिक व त्र्यंबकेश्‍वर परिसरातील भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा वाटा राहणार असल्याने नियोजन सुरू आहे. … ‘फूड ट्रक’च्या माध्यमातून सर्वांना जेवण कुंभमेळा पर्वणीच्या दिवशी पार्किंगच्या ठिकाणी महिला बचतगटांमार्फत ‘फूड ट्रक’ उभे केले जातील. त्यातून जेवण पुरविले जाईल. पोलिस अधिकारी, कर्मचारी, सुरक्षारक्षक, शासकीय कर्मचारी व भाविक या सर्वांना जेवण पुरविण्यासाठी महिला बचतगटाने उभारलेली ही व्यवस्था राहणार आहे. ‘फूड ट्रक’च्या माध्यमातून सर्वांना जेवण पुरविण्याचे नियोजन आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त ग्रामीण भागातील महिला बचतगटांना हक्काचा रोजगार उपलब्ध होईल. बचतगटांच्या अर्थकारणाला यातून गती मिळेल. ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रथमच नाशिक व त्र्यंबकेश्‍वरला येत आहेत. त्र्यंबकेश्‍वरला त्यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर गोदाआरती होणार आहे. तसेच त्र्यंबकराज मंदिरात पूजाविधी करण्याचे नियोजन आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री, आमदार, खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधी, आखाड्यांचे साधु-महंत या ठिकाणी उपस्थित राहतील. त्यांच्या नियोजनाची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझ्याकडे व प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्याकडे आहे. … ८३ कोटींची विकासकामे ध्वजारोहणाच्या निमित्ताने सिंहस्थ कुंभमेळ्यास प्रारंभ होत आहे. नाशिक व त्र्यंबकेश्‍वरमधील विकासकामांना गती मिळाली आहे. याशिवाय सर्वतीर्थ टाकेद, कावनई या ठिकाणचे धार्मिक महत्त्व विचारात घेऊन एकूण ८३ कोटींची विकासकामे करण्यात येतील. यातून त्र्यंबकेश्‍वरसह ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राचाही विकास होण्यास मदत होणार आहे. अंजनेरी येथे रोपवे बसविण्यात येणार आहे. ब्रह्मगिरी फेरी मारणाऱ्या भाविकांसाठीही काही सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू असल्यामुळे एकूणच सिंहस्थानिमित्त नाशिक व त्र्यंबकेश्‍वर शहरांबरोबरच ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राचाही विकास होत आहे. .. अनुभवच अधिक समृद्ध करेल सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव हा ‘न भूतो ना भविष्यति’ असा असणार आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून सिंहस्थ काळातील नियोजन, जबाबदाऱ्यांचा अनुभव भविष्यात निर्णय घेण्यासाठी उपयोगी ठरेल. कोट्यवधी भाविकांना येणाऱ्या अडचणी व त्या सोडविण्यासाठी घ्यावे लागणारे निर्णय, हा यातील अत्यंत महत्त्वाचा भाग असेल. उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करून भाविकांना पर्वणीचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्नशील राहणार आहोत. पुढील साधारणत: वर्षभर सिंहस्थ कुंभमेळ्यातील विविध जबाबदाऱ्या आणि नियोजनाचा भाग म्हणून वेगवेगळ्या भूमिकांमधून जावे लागणार आहे. हा अनुभवच आपल्याला अधिक समृद्ध करेल, असा विश्‍वास वाटतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com