नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने अद्याप निधी मंजूर केलेला नाही. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फक्त एक हजार कोटी रुपये पुरवणी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. निधी नसल्याने विकासकामे अडलेली असताना त्यापूर्वीच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा हिशेब मागितला जात आहे.