सिंहस्थ कुंभमेळा ध्वजदंड प्रतिष्ठापनेसह आजपासून धार्मिक कार्यक्रम

सिंहस्थ कुंभमेळा ध्वजदंड प्रतिष्ठापनेसह आजपासून धार्मिक कार्यक्रम
Published on: 
पान एक मेन --------------- 33921 नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणानिमित्त रामतीर्थ परिसरात करण्यात आलेली सजावट. कुंभमेळा ध्वजदंड प्रतिष्ठापनेसह आजपासून धार्मिक कार्यक्रम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत उद्या ध्वजारोहण, गोदाआरती, प्रार्थना सकाळ वृत्तसेवा नाशिक, पंचवटी, ता. २९ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणानिमित्त पुरोहित संघाच्यावतीने तीन दिवसीय ध्वजदंड प्रतिष्ठा सोहळा व धार्मिक विधी होणार आहेत. यज्ञविद्या वाचस्पती वेदमूर्ती भालचंद्र एकनाथ शास्त्री शौचे गुरुजी (श्री क्षेत्र नाशिक) तथा यज्ञ आचार्य पंडित वैभव दीक्षित यांच्या शास्त्रोक्त आणि वेदोक्त पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली हा तीन दिवसीय सोहळा होणार आहे. शुक्रवारी (ता.३०) (अश्विन कृष्ण पंचमी) सकाळी ८:१५ वाजता नगरप्रदक्षिणा होईल. त्यानंतर ९ ते १२.३० प्रायश्चित्त संकल्पपूर्वक तीर्थ पूजन, पंचार्घ्य प्रदान, प्रधान संकल्प, गणेश पूजनादी पंचांग विधान, ब्राह्मण वरण, प्रधान देवता स्थापन आणि नवग्रह रुद्र स्थापन तर दुपारी २.३० ते सायंकाळी ७.३० ला स्नपन विधान, नवग्रह हवन, प्रतिष्ठापना हवन, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंपूजन आणि श्री गोदावरी प्रार्थना होणार आहे. शनिवारी ३१ ऑक्टोबर (अश्विन कृष्ण षष्ठी) सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत स्थापित देवता प्रातर्पूजन होईल. सकाळी ११ ते १२.३० महामहिम राष्ट्रपती व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेश पूजन, पंचार्घ्य समर्पण व तीर्थ पूजन होणार असून दुपारी ठीक १२.०२ ला मुख्य ध्वजारोहण, गोदाआरती व प्रार्थना होईल. सायंकाळी ४.३० ते ७.३० प्रतिष्ठापना हवन, सायंपूजन व गोदाआरती होणार आहे. तृतीय दिन, रविवारी, १ नोव्हेंबर (अश्विन कृष्ण सप्तमी) सकाळी ९.३० ते १२.३०: प्रातर्पूजन, उत्तराखंड हवन, बलिदान, पूर्णाहुती, अवभृत स्नान, गोदाआरती, प्रार्थना आणि कर्म समर्पण हे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, वैभव दीक्षित, सरचिटणीस प्रतीक शुक्ल, कार्याध्यक्ष शेखर शुक्ल यांनी केले आहे. --------------- स्वतंत्र एका पॅकेज मध्ये लावणे --------- रामतीर्थावर ‘जनजातीय सिंहस्थ महाआरती’ सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने शनिवार (ता. ३१) रोजी रामतीर्थ येथे गोदापूजन व जनजातीय सिंहस्थ महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्यास भारताच्या महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अशी माहिती रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने देण्यात आली आहे. या महाआरतीचे सर्वात महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद वैशिष्ट्य़ म्हणजे विविध समाजघटकांतील महिला पुरोहित म्हणून गोदावरी मातेच्या पूजनविधीचे पौरोहित्य करणार आहेत. धार्मिक विधींचे निवेदन, पूजनविधीचे मार्गदर्शन आणि महाआरतीच्या नेतृत्वाची संपूर्ण धुरा महिला पार पाडणार आहेत. जनजातीय बांधवांचा सन्मानपूर्ण सहभाग हे या आयोजनाचे आणखी एक मोठे आकर्षण आहे. निसर्ग, जलस्रोत आणि पर्यावरणाशी त्यांचे असलेले अतूट नाते लक्षात घेऊन त्यांच्या सांस्कृतिक परंपरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. महिला, जनजातीय बांधव, संत-महंत आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर यांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा सोहळा सामाजिक समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा अत्यंत प्रेरणादायी संगम ठरणार आहे. ‘गोदावरी माता सर्वांची, तिची सेवा सर्वांची आणि तिच्या साक्षीने समाजातील प्रत्येक घटकाला आत्मीयतेने जोडणे, हीच खरी सामाजिक समरसता! हा संदेश या महाआरतीच्या माध्यमातून दिला जाणार आहे. या प्रसंगी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, सचिव मुकुंद खोचे, उपाध्यक्ष नरसिंहकृपा प्रभू, भक्तीचरणदास महाराज, धनंजय बेळे, चिराग पाटील, शिवाजी बोंदारडे, राजेंद्र फड, आशिमा केला, अभय नेरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.