टूडे साठी
-------------
एकल महिलांच्या सर्वेक्षणास
३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १५ : महापालिका क्षेत्रातील एकल महिलांची माहिती संकलित करण्याच्या विशेष मोहिमेला शासनाकडून ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. घरोघरी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यामार्फत हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या अनुषंगाने महापालिका क्षेत्रातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सहाही विभागीय कार्यालयांच्या हद्दीत ही माहिती संकलित केली जाणार आहे. या सर्वेक्षणातून एकल महिलांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती, त्यांच्या समस्या, गरजा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे. निश्चित नमुन्यातील माहिती एक्सेल स्वरूपात जतन करून संबंधित विभागाकडे सादर केली जाणार असून, सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्या समन्वयाने हे काम पूर्ण केले जाणार आहे.एकल महिलांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे उपायुक्ताकडून करण्यात आले आहे.
------------------------