‘सिंहस्थ’ ध्वजारोहणाची उद्या रंगीत तालीम

‘सिंहस्थ’ ध्वजारोहणाची उद्या रंगीत तालीम
Published on: 
‘सिंहस्थ’ ध्वजारोहणाची उद्या रंगीत तालीम पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तात प्रत्यक्ष सराव सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १३ : आगामी सिंहस्थ कुंभमेळाच्या अनुषंगाने शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांच्या सुरक्षेसाठी नाशिक शहर पोलिस सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, वाहतूक नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या गुरुवारी (ता. १५) सकाळी अकराला पोलिस बंदोबस्ताची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने शहरात ३० तारखेला धर्मध्वज शोभायात्रा व नगरप्रदक्षिणा निघणार आहे. तर, ३१ तारखेला दुपारी रामतीर्थ येथे मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम, सायंकाळी गोदावरी आरती होणार आहे. या सर्व कार्यक्रमांची पूर्वतयारी आणि सुरक्षेची चाचपणीसाठी गुरुवारी (ता. १५) पोलिस आयुक्तालयाकडून कडेकोट बंदोबस्तासह रंगीत तालीम केली जाणार आहे. या रंगीत तालमीदरम्यान ३१ तारखेला ध्वजारोहण आणि गोदाआरती सुरक्षेची चाचपणी केली जाईल. ३० तारखेला धर्मध्वज शोभायात्रेच्या बंदोबस्ताचे प्रत्यक्ष नियोजन व अंमलबजावणी तपासली जाईल. त्याअनुषंगाने पोलीस अधिकारी व अंमलदारांमधील समन्वय, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत करावयाची तत्पर कारवाई यांची सखोल तपासणी केली जाणार आहे. अशी असेल वेळ - ​सकाळी १०.३० ते ११.३० : ध्वजारोहण कार्यक्रम बंदोबस्त सराव, रामतीर्थ परिसर -​ सकाळी ११.३० ते १२.३० : गोदाआरती बंदोबस्त आढावा, भाजी बाजार पटांगण परिसर, रामतीर्थ -​ दुपारी १२.३० ते १.३० : शोभायात्रा/नगरप्रदक्षिणा मार्ग बंदोबस्त पडताळणी, मिरवणूक मार्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com