Kumbh Mela
sakal
नाशिक: नाशिक ही धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली नगरी असून, येथे परंपरागत मंदिरे, गोदाघाट तसेच अनेक वारसा स्थळे आहेत. गुरू सिंह राशीत प्रवेश करत असल्याने येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. या प्राचीन नगरीला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी बनवण्याचा निर्धार असल्याचा विश्वास नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.