पान-४ मेन
------------
प्रभाग क्र. १५
(तांबेश्वरनगर, अपना गँरेज, डुबेरेनाका, उबाळेमळा, काळेमळा, संस्कृती हाँटेल परिसर )
---------------
भगवान लोणारे ः SNR26B23491
नामदेव शिंदे ः SNR26B23489
विलास जाधव ःSNR26B23487
सुवर्णा उबाळे SNR26B23485
--------------
SNR26B23483
सिन्नर ः शिवनदीतील दुर्गंधीयुक्त पाणी.
--------------
SNR26B23480
सिन्नर ः तांबेश्वर नगरात झालेले सिमेंट काँक्रीट रस्ता
---------------
सतत कमी दाबाने होतोय पाणीपुरवठा
आठ वर्षांपासून समस्या कायम, स्त्यांची सुविधा अपुरी ः नगरसेवकांकडून स्वखर्चाने टँकर
संपत ढोली । सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१२ ः अपना गँरेज ते डुबेरेनाका, शिवनदी ते ढोकी फाटा असा दाट झोपडपट्टीसह मळ्यांमध्ये विखुरलेला हा प्रभाग आहे. शिवनदी व सरस्वती नदीच्या कडेला वसलेली झोपडपट्टी आणि या झोपडपट्टीच्या मुलभूत समस्यांनी ग्रस्त असलेला हा प्रभाग आठ पुरेशा दाबाने पाणी पुरवठ्याच्या प्रतीक्षेत आहे.
--------------
अपना गँरेज, तांबेश्वरनगरातील झोपडपट्टीत सर्वात मोठी समस्या पाणीपुरवठ्याची आहे. कमी दाबाने पाणी मिळत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही नागरिकांना पाणी मिळते तर काही तसेच पाण्यावाचून राहतात. ही समस्या सोडवण्यासाठी जलकुंभ भरल्यानंतर या भागाला पुन्हा काही काळ पाणी सोडले जाते. परंतु आठ वर्षापासून ही समस्या अजूनही सुटण्याचे नाव घेत नाही. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
१६-१
नगरसेवकांचे स्वखर्चातून टँकर
शेळके गल्लीत तर अनेकदा गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. पुरेसे पाणी मिळत नसल्याने अखेर नगरसेवक सुवर्णा उबाळे यांनी स्वखर्चातून टँकर सुरु केले आहेत. प्रशासनाला ही समस्या जागेवर बोलावून दाखविण्यात आली असली तरी हा प्रश्न अजून तसाच आहे. तांबेश्वरनगरातील रस्त्याचा प्रश्न आता सुटला आहे.
१६-१
तांबेश्वरनगराला दुर्गंधीचा त्रास
तांबेश्वरनगराजवळून देवनदी वाहते. नदीत सांडपाणी सोडलेले असल्याने ते तसेच साचून राहते. त्यामुळे तांबेश्वरनगरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात या पाण्याची दुर्गंधीही अधिक आहे, त्यावर उपाययोजना करण्याची मागणी आहे.
१६-१
घरांचे नियमानुकूलचा प्रश्न
झोपडट्टीतील घरांचे नियमानुकूल करण्याबाबत नागरिक आशादायी आहेत. त्यासाठी रहिवाशांचे अर्ज भरुन घेतले आहेत. मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ही कार्यवाही होण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. शेळके गल्ली, अपना गँरेज, हुसेनबाबा नगर परिसरात रस्ते खराब आहेत. काही भागात पाणी येताच वीज गायब होते. (समाप्त)
१६-१
प्रभागासाठीचे नियोजीत प्रस्ताव
१) शेळके गल्ली, अपना गँरेज, उबाळे मळा, वाजे-वारुंगसे मळा रस्त्यांचे प्रस्ताव
२) शेळके गल्ली, अपना गँरेज, उबाळे मळा, वाजे-वारुंगसे मळा बंदीस्त गटारींचे प्रस्ताव
३) डुबेरे रस्त्यासह प्रभागात दोन नवीन ट्रान्सफार्मर
४) तांबेश्वर नगरात बगीचा विकसित करणे
--------------
लोगो--नगरसेवक काय म्हणतात
प्रभागातील पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रशासनाला समस्यांबाबत माहिती दिली आहे. हा प्रश्न गांभीर्याने सोडविण्यावर भर दिला आहे. रस्त्यांचेही प्रस्ताव मंजुरीस आहेत.
- सुवर्णा उबाळे (नगरसेवक)
------------
रस्ते, वीज, पाणी असे मुलभूत प्रश्न सोडविले जात आहेत. काही भागात कमी दाबाने पाणी जाते. तो सोडविण्याचाही प्रयत्न सुरु आहे.
- विलास जाधव (नगरसेवक)
-----------
लोगो
नागरिक काय बोलतात
नगरात चांगले गार्डन होण्याची अपेक्षा आहे. घंटागाड्या वेळेत आल्यास कचरा संकलन अधिक सोपे होईल. वीज व्यवस्था चांगली आहे.
- नामदेव शिंदे (रहिवासी, तांबेश्वरनगर)
-----------
शिवनदीत रुग्णालयांसह शहरातील गटारींचे पाणी सोडले जाते. हे पाणी दूषित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. झोपडपट्टी नियमानुकूल करण्यात यावी.
- भगवान लोणारे (रहिवासी, तांबेश्वर मंदिर परिसर)
--------------------