पान चार
---------------
23150
सिन्नर : लोकनेते वाजे विद्यालयात माजी विद्यार्थी सभागृह फलकाचे अनावरण करताना आमदार माणिकराव कोकाटे, अँड. नितीन ठाकरे, प्रकाशभाऊ वाजे, कृष्णाजी भगत, बाळासाहेब क्षीरसागर आदी.
माजी विद्यार्थी सभागृह गौरवशाली परंपरेचे प्रतिक
ॲड. नितीन ठाकरे: सभागृह लोकार्पणप्रसंगी प्रतिपादन
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १८ : माजी विद्यार्थी सभागृह हे विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक असून सभागृहाच्या माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल, असे प्रतिपादन मविप्र संस्थेचे सरचिटणीस अँड. नितीन ठाकरे यांनी केले. माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येवून लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात उभारलेल्या सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
आमदार माणिकराव कोकाटे, अँड. ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार गोकुळ गीते, चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, संचालक कृष्णाजी भगत, संदीप गुळवे, अमित बोरसे, आर. के. बच्छाव, जे. के. मैनी कारखान्याचे कमलाकर टाक, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनोज भगत, मुख्याध्यापक राम ढोली आदी उपस्थित होते.
प्रकाश वाजे यांनी माजी विद्यार्थी व विद्यालयाचे ऋणानुबंध अधिक दृढ होण्यासाठी सभागृहाची भूमिका महत्वाची असल्याचे सांगितले. आमदार गिते यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीचे कौतुक केले. सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यालयाची शैक्षणिक परंपरा समृद्ध होत असल्याचे सांगितले. बाळासाहेब देशमुख यांनी प्रास्ताविक केले. अपर्णा क्षत्रीय यांनी सुत्रसंचालन तर सोमनाथ वाघ यांनी आभार मानले.