23282
सिन्नर : बॅडमिंटन चॅम्पियनशिप व टेबल टेनिस स्पर्धेत यश मिळविलेल्या खेळाडूंचा गौरव करताना किरण भंडारी, सिमंतीनी कोकाटे, विठ्ठल उगले, प्रसाद पाटोळे आदी.
सिन्नरमध्ये बॅडमिंटन,
टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. २८ : स्पोर्टस् असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या दोन दिवसीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप व टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात झाल्या. यावेळी स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील लोकनेते वाजे विद्यालय, एस. जी. पब्लिक स्कूल, होरायझन ॲकॅडमी, नांदूर शिंगोटे विद्यालय यासह इगतपुरी तालुक्यातील शाळांतील खेळाडूंनी सहभाग घेतला. सारडा स्पोर्ट्स सेंटर येथील प्रशिक्षक मोहन पाटील, संतोष साळुंके यांनी विशेष मेहनत घेतली. सिन्नर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष किरणजी भंडारी, उपाध्यक्ष वैभव मुत्रक, सचिव रवी मोगल, यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य किरण गोजरे, किरण वाघ, कैलास शिंदे, योगेश शिंदे, विनोद दांताळ, सूर्यकांत थोरात, अभी सायखेडकर, गणेश पगार, प्रसाद पाटोळे, गणेश शिरसाठ, सूत्रसंचालक गणेश दिघे यांनी संयोजन केले.
खासदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सिमंतीनी कोकाटे, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, प्रशांत रायते यांनी स्पर्धेवेळी भेटी देवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.