सिन्नर-शासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याबाबत पांगरी येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब बैरागी यांनी अशा कर्मचाऱ्यांच्या वाहनांतील हवा सोडण्याचे आंदोलन हाती घेतले आहे. वावी येथील आरोग्य अधिकारी शीतल रॉय यांना मंगळवारी (ता. २४) या आंदोलनाला सामोरे जावे लागले.